Social Media वापरताना काळजी घ्या.! या कारणांमुळे होऊ शकते कारवाई, सर्वोच्च कोर्टाचे कडक निर्देश…

तालुका/प्रतिनिधी

 

यापुढे नागरिकांनी विषतः तरुण/तरुणींनी सोशल मीडियाचा वापर करताना सावध राहण्याची खास गरज आहे. कारण देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने एका केस संदर्भात भाष्य करताना स्पष्ट निर्देश देत; यापुढे माफी मागून चालणार नाही, तर शिक्षा होणे गरजेच आहे असं म्हंटले आहे. त्यामुळं यापुढे Social Media वापरताना आणि काही पोस्ट शेअर करताना त्यावर टीका टिप्पणी करताना विशेष काळजी घ्या.!

 

सोशल मीडियावर असभ्य आणि अपमानास्पद पोस्ट टाकणाऱ्यांना शिक्षा होणे आवश्यक असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. असे लोक माफी मागून फौजदारी कारवाईतून सुटू शकत नाहीत. त्यांना त्यांच्या कृत्याचे परिणाम भोगावे लागतील, असेही कोर्टाने म्हटले.

 

शुक्रवारी दि. 18 ऑगस्ट रोजी ही टिप्पणी करताना सर्वोच्च न्यायालयाने तामिळनाडूचे अभिनेते आणि माजी आमदार एसव्ही शेखर यांच्याविरुद्ध दाखल केलेला खटला; रद्द करण्यास नकार दिला. महिला पत्रकारांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेखर यांनी फेसबुकवर महिला पत्रकारांना लक्ष्य करत आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. एका महिला पत्रकाराने तामिळनाडूचे तत्कालीन राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्यावर गालाला स्पर्श केल्याचा आरोप केला होता. महिला पत्रकाराच्या या आरोपाबाबत शेखर यांनी मत मांडले होते. त्यांच्या या पोस्टनंतर बराच वाद झाला होता. द्रमुकने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. शेखरने नंतर माफी मागितली आणि पोस्ट डिलीट देखील केली, परंतु या पोस्टबद्दल तामिळनाडूमध्ये त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले होते.

 

सर्वोच्च न्यायालय न्यायमूर्ती बीआर गवई आणि न्यायमूर्ती प्रशांत कुमार म्हणाले की, शेखर यांनी पोस्टचा मजकूर न वाचता शेअर कसा केला? त्यानंतर या प्रकरणातील त्यांच्याविरुद्धच्या कारवाईत हस्तक्षेप करण्यास नकार दिला. न्यायालयाने कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्यास सांगितले. तसेच लोकांनी सोशल मीडियाचा वापर करताना खूप लक्ष दिले पाहिजे. सोशल मीडियाचा वापर गरजेचा नाही, पण जर कोणी केला तर त्याची चूक झाली तर त्याची खापर सहन करायला तयार राहायला हवे असेही न्यायालयाने म्हंटले आहे.