तालुका/प्रतिनिधी
किनवट – माहूर तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्ते विकासाला प्राधान्य देत आमदार भीमराव केराम यांनी राज्य शासनाकडे सतत पाठपुरावा करून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून किनवट मतदार संघातील विविध गाव खेड्याना जोडणाऱ्या रस्त्यासाठी २७ कोटी रुपयांचा निधी खेचून आणला असून या कामाची निविदा प्रक्रिया लवकरच पूर्ण होऊन पावसाळ्यापूर्वी कामाला प्रारंभ होणार असल्याची माहिती लोकार्पण कार्यालयातून देण्यात आली आहे.
मजबूत व पक्के रस्ते हा विकासाचा केंद्रबिंदू मानून आमदार भीमराव केराम हे किनवट मतदार संघातील वाडी तांड्याना जोडणारे रस्ते, पूल तसेच नवीन रस्त्यासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी खेचून आणत आहेत. किनवट मतदार संघातील वाडी तांड्यांना व खेड्यांना राष्ट्रीय महामार्ग व राज्य मार्गांना जोडून दळणवळणाची कायमस्वरूपी सोय उपलब्ध व्हावी यासाठी पंतप्रधानग्राम सडक योजनेच्या धर्तीवर राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून त्यांनी तालुक्यातील वर २२ ते लिंगीतांडा या रस्त्यासाठी १ कोटी २८ लक्ष रु, चऊठ-०८ ते गेंदा पेंदा या रस्त्यासाठी १ कोटी ६१ लाख रु राज्यमार्ग ५१ ते दरसांगवी मोहाडा या रस्त्याची सुधारणा करण्यासाठी २ कोटी ७५ लक्ष रु, राष्ट्रीय महामार्ग १६१ ते गोंडवडसा बोरड या रस्त्यासाठी ३ कोटी ३५ लक्ष रु, राष्ट्रीय महामार्ग १६१ गोंड वडसा ते नायकवाडी रस्ता सुधारना करणे ३ कोटी ३ लक्ष रु, प्रमुख जिल्हा मार्ग – २ ते करंजी भगवती रस्ता सुधारणा करणे २ कोटी ६६ लक्ष रु, जलधरा ते नांदगावतांडा ३ कोटी ४० लक्ष रु, राष्ट्रीय महामार्ग २६७ ते नागापूर कोलामखेडा ४ कोटी ५३ रु, महामार्ग १६१ ते दिगडी मंगाबोडी मांडवा (आश्रम शाळा ते मांडवा) रस्ता २ कोटी ९१ लक्ष रु व ग्रामीण मार्ग २२ ते लिंगीतांडा १ कोटी ८९ लक्ष रुपये असा एकूण २७ कोटी ४८ लक्ष रुपयाचा निधी आमदार भीमराव केराम यांनी खेचून आणला आहे.