तालुका/प्रतिनिधी
इयत्ता बारावीचा निकाल लवकरच लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचीही निकालाची प्रतिक्षा संपुष्टात येणार आहे. बारावी नंतर पुढे काय? याचा निर्णय बारावीच्या निकालांवर अवलंबून असल्याने विद्यार्थी या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. बारावीनंतरच्या शैक्षणिक वाटचालीसाठी हा निकाल अत्यंत महत्त्वाचा असतो. फेब्रुवारी-मार्च महिन्यात झालेल्या या परिक्षांचा निकाल हा मे महिन्याच्या शेवटपर्यंत जाहीर केला जातो. महाराष्ट्र स्टेट बोर्ड लवकरच निकालाची तारीख जाहीरकरणार आहे. सायन्स, कॉमर्स, आर्ट तिन्ही विभागांचा निकाल महाराष्ट्र स्टेट बोर्टच्या अधिकृत वेबसाईटवर mahresult.nic.in पाहता येईल. यासोबतच विद्यार्थ्यांना SMS द्वारेही निकाल पाहता येणार आहे.केव्हा होणार निकाल जाहीर ?
महाराष्ट्र स्टेट बोर्ड 25 मे रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. २५ मे रोजी दुपारी २ वाजता ऑनलाईन पद्धतीने निकाल लागणार आहे.