आर्थिक अनियमितता प्रकरणी मुख्याध्यापक निलंबित.

तालुका/प्रतिनिधी

 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आनमाळ येथील प्रभारी मुख्याध्यापक आष्ठुरे सतिश निवृती यांच्याविरुद्ध प्राप्त विविध तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी अंती निलंबनाची धाडसी कार्यवाही करण्याचे आदेश माहूरचे गटशिक्षणाधिकारी रवींद्र जाधव यांनी दिले आहेत. या कार्यवाहीमुळे तालुक्यात शालेय पोषण आहार, वेतनातील अनियमितता व तसेच शालेय व्यवस्थापन समितीच्या परवानगीशिवाय व्यवहार करणाऱ्या पुढारी मुख्याध्यापकांचे पुरते धाबे दणाणले आहे.

अनमाळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सहशिक्षक यु.एम. नरवाडे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आत्माराम राठोड व पोषण आहार स्वयंपाकी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार प्रभारी मुख्याध्यापकसतिश आष्ठरे यांनी एलआयसीची दरमहा वेतनातून कपात केलेली रक्कम संबंधिताच्या खाती वर्ग न करणे, शालेय करणे, वस्तुची परस्पर विक्री करून आलेली रक्कम स्वहीतासाठी खर्च शालेय पोषण आहार अंतर्गत प्राप्त इंधन व भाजीपाला खर्च स्वतःच्या नावे विनापरवानगी उचल करणे या बाबत कार्यालयास प्राप्त तक्रारीनुसार सतिश आष्टूरे प्रभारी मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आनमाळ यांची चौकशी करून कारणे दाखवा नोटीस बजविण्यात आली होती. आष्टुरे यांनी सादर केलेला खुलासा अव्यवहार्य, विसंगत व प्रशासनाची दिशाभुल करणारा असल्याने खुलासा अमान्य करून सतिश आष्टुरे यांनी आर्थिक अनियमितता, कर्तव्यात कसुर करणे व आरोपात तथ्य आढळून आले आहे. त्यामुळे त्यांना सेवेतून निलंबीत केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *