कुपटी ते बोरवाडी भिमपुर रस्त्याचे काम निष्कृष्ट..! मुख्यमंत्री ग्रामसडक योजना बनली भ्रष्टाचाराचे कुरण.

प्रतिनिधी/विकास मेहता

श्रीक्षेत्र माहूर : तालुक्यात अनेक गावात जाण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत रस्ते, नाल्यात पुलाची कामे सुरू असून सदर कामावर कुणाचेही नियंत्रण नसल्यामुळे ती कामे रामभरोसे होत आहेत सदरची कामे अतिशय दर्जाहीन होत असल्याने त्या कामाबद्दल कुपटी, बोरवाडी ,भिमपुर गावातील विकासप्रेमी नागरिकांनी संबधीत विभागाकडे अनेक तक्रारी केल्या आहेत.

कुपटी ते बोरवाडी भिमपुर रस्त्याचे दहा मिटर तिन गाळ्याच्या पुलाच्या कामासाठी 97 लक्ष 13 हजार रुपये मंजूर करण्यात आला.सदरचे काम कार्यकारी अभियंता महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था नांदेड महाराष्ट्र शासन अर्थसहाय्य प्रकल्पाअंतर्गत करण्यात येतअसून या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी 3 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे, ही दोन्ही कामे दर्जाहीन होत असल्याने वरील तीन तिनही गावच्या नागरिकांनी यावर आक्षेप घेतला असून नाल्यावरील पुलाचे काम झाले,

नसल्याने पावसाळ्यात या भागातील नागरिकांचे प्रचंड हाल होणार असून वरील तिनही गावाचा संपर्क तुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे, आजपर्यंत एकाही कामाच्या एवढ्या मोठ्या प्रमाणात तक्रारी झाल्या नाहीत त्यापेक्षाही मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या दर्जाहीन कामाच्या जास्त तक्रारी होऊनही अद्यापपर्यंत या कामाकडे एकाही संबधित अधिकार्‍यांने ढुंकूनही पाहीले नसल्याने नागरीकांकडुन आश्चर्य व्यक्त केले जात आहे. किमान किनवट माहूर मतदारसंघाचे आ.भीमराव केराम, व खा. हेमंत पाटील यांनी या गंभीर बाबीकडे जातीने लक्ष घालून सदर कामाची पाहणी करावी व निक्रुष्ट दर्जाचे कामाची माहिती घेऊन संबधीत विभागाचे अधिकारी व ठेकेदाराविरुध्द कारवाई करावी अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त केली जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *