जप्त केलेले रेती साठे घरकुल लाभार्थ्यांना द्यावे – युवा ग्रामीण पत्रकार संघ.

प्रतिनिधी/ज्ञानेश्वर गुरनुले

किनवट/माहूर तालुक्यातील सर्वच रेती घाट बंद आहेत, तरी पण खूप मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी होत असल्याने बऱ्याच ठिकाणी महसूल प्रशासनाने अवैध रेतीचे साठे जप्त केले आहेत. जप्त केलेले रेतीचे साठे गोरगरीब घरकुल लाभार्थ्यांना देण्यात यावे अशी मागणी युवा ग्रामीण पत्रकार संघा कडून करण्यात आली. गरिबांना घरकुल तर मिळत आहे आणि रेती मात्र मिळत नाही. किनवट/माहूर तालुक्यात कुठल्याही प्रकारचा शासकीय डेपो पण सुरु करण्यात आलेला नाही. रेती तस्कर मात्र खूप मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी करून मराठवाड्यातून विदर्भात पुसद आणी उमरखेडला नेऊन चढ्या भावात विकत आहेत.
मागे दोन दिवसापूर्वी युवा ग्रामीण पत्रकार संघ माहूर, टीमने मौजे हिंगणी घाटावर जवळपास शंभर ब्रास पेक्षा जास्त रेती साठा महसूल प्रशासनाला पकडून देण्यात मदत केली. पण दोन्ही तालुक्यात जप्त केलेला रेतीसाठा किती दिवस राहतो माहित नाही कारण रेती तस्कर जप्त केलेला साठा चोरून नेतील. माहूर तालुक्यात एकही घाटाचा लिलाव झालेला नसताना, एवढ्या मोठ्या प्रमाणात रेती तस्करी होते. तरी यासाठी महसूल प्रशासन माहूर सर्वस्व जबाबदार आहे. या संदर्भात सखोल चौकशी करण्यात यावी तसेच दोन्ही तालुक्यातील जप्त केलेला रेतीसाठा घरकुल लाभार्थ्यांना शासकीय दरानुसार देण्यात यावा अशी मागणी युवा ग्रामीण पत्रकार संघाने आपल्या निवेदनातून केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *