शासन आपल्या दारी उपक्रमात कर्मचारी गैरहजर माहुर भाजपा तालुका अध्यक्ष कांतराव घोडेकर यांनी दिले निवेदन. तात्काळ कारवाई करण्याची मागणी

श्रीक्षेत्र माहूर प्रतिनिधी/सुनिल राठोड

माहूर :-महाराष्ट्र शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या लोकोपयोगी योजना नागरी पर्यंत पोहोचाव्या यासाठी शासन आपल्या दारी हा उपक्रम सुरू करण्यात आला असून या कार्यक्रमात गावागावात माहिती देण्यासाठी अभियान रथ जात असून येथे ग्रामपंचायत स्तरावर सर्व गावातील कर्मचाऱ्यांनी हजर राहून या या कार्यक्रमाची माहिती देत नागरिकापर्यंत सहज लाभ पोहोचावेत यासाठी जनजागरण करणे अत्यावश्यक असताना या कार्यक्रमात सर्वच कर्मचारी अधिकारी गैरहजर राहत असल्याने मुख्यत्वे ग्रामसेवक गैरहजर राहत असल्याने त्यांना सक्त ताकीद देऊन सदरील कार्यक्रमाची अंमलबजावणी शंभर टक्के व्हावी यासाठी त्यांचे वर कारवाई करण्याची मागणी भाजपाचे तालुका अध्यक्ष कांतराव घोडेकर यांचे सहकार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे तहसीलदार यांच्याकडे केली आहे. महाराष्ट्रातील भाजपा सरकारकडून सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येत असून त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी शेती विषयक योजना निराधारसाठी निराधार योजना तसेच ओबीसी साठी असलेल्या सर्व योजना महिला बचत गटासाठी असलेल्या सर्व योजना विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास आणि शिक्षणासाठी असलेल्या सवलत योजना तसेच अनुसूचित जाती जमातीसाठी असलेल्या योजना रस्ते विकास खेडेगावातील विकास योजना सौर ऊर्जा योजना शुद्ध पाणी पुरवठ्यासाठी तालुक्यातील 51 गावात दिलेल्या नळ योजना शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी आरो प्लांट योजना तसेच माहूर तालुक्यातील नदीपात्रावर होणारे बंधारे त्यापासून होणारे शेतकऱ्यांना लाभ तसेच विविध विकास कामांतर्गत समशान भूमी विकास योजना पाटील तसेच तालुकास्तरीय खासदार आमदार निधी यातून होणारे विकास कामे तळागाळातील नागरिकांना जीवनमान उंचावण्यासाठी सुलभ कर्ज योजना तालुक्यात सुरू असलेली पोलीस पाटील भरती प्रक्रिया तसेच इतर सर्व शासकीय योजनांची माहिती शासन आपल्या दारी या उपक्रमात देण्यात येत असून तसेच या योजनेचा लाभ घेणाऱ्या नागरिकांच्या संचिकात असलेल्या तुरटी तात्काळ जागेवर दूर करून या योजनेचा लाभ त्यांना तात्काळ मिळावा यासाठी शासन आपल्या दारी योजना राबविण्यात येत आहे यासाठी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते अहोरात्र परिश्रम घेऊन शासनाचा उपक्रम शंभर टक्के यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
परंतु या योजना राबविण्यासाठी एकीकडे शंभर टक्के प्रयत्न होत असताना दुसरीकडे गाव पातळीवरील ग्रामसेवक तलाठी पोलीस पाटील अंगणवाडी पोलीस व इतर कर्मचारी या अभियानात सहभाग नोंदवत नसल्याने गावागावात ही विकास कामे पूर्ण करण्यासाठी अडचणी येत आहेत. भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष कांतराव घोडेकर यांनी माहूर चे तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊन तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे यावेळी कांतराव घोडेकर यांचे सह अनिल वाघमारे अमोल पाटील हडसणीकर विनायक मुसळे नंदू कोलपवार अशोक जोशी राजू दराडे यांचे सह भाजपाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *