चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वाढदिवसानिमित्त तालुका अध्यक्ष श्रीकांत घोडेकर यांच्या हस्ते अभिषेक व महाआरती संपन्न करण्यात आली.

प्रतिनिधी/सुनील राठोड

माहूर :- श्रीक्षेत्र माहूर येथील साडेतीन शक्तीपीठां पैकी एक असलेल्या जगप्रसिद्ध रेणुका माता मंदिरात
भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वाढदिवसानिमित्त रेणुका मातेला अभिषेक व महाआरती भाजपा तालुकाध्यक्ष श्रीकांत घोडेकर यांच्या हस्ते संपन्न करण्यात आले. यावेळेस भाजपा शहराध्यक्ष पुरुषोत्तम लांडगे, भाजपा जेष्ठ नेते नागोराव सुर्वे, भाजपा तालुका सरचिटणीस अर्चना दराडे, महिला शहर अध्यक्ष सौ, निर्मला अशोक जोशी कुपटी सुपरवारियस अक्षय पांडे तालुका कार्यकारिणी सदस्य नीता राठोड, कल्पना घोडेकर, योगिता दिलीप धुर्वे, मंजू होले, अर्चना गिनगुले, अनिता गिनगुले,व तालुक्यातील महिला पुरुष पदाधिकारी उपस्थित होते
माननीय प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना दीर्घायुष्य लाभो व 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीला यश लाभो ही प्रार्थना करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *