राहुल नार्वेकरांचा माहूर युवासेनेतर्फे जोडे मारून निषेध!

श्रीक्षेत्र माहूर/सुनिल राठोड

माहूर :- विधानसभा सभागृहात राज्यातील सत्ता संघर्षाचा निकाल लागला आणि याकडे संपूर्ण महाराष्ट्रासह देशवासियांचे लक्ष लागून होते. काल बुधवार दिनांक १०\०१\२०२४ रोजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सह सोळा आमदार पात्र ठरवले आणि एकतर्फी शिंदे च्या बाजूने निकाल दिल्याच्या निषेधार्थ युवासेना जिल्हाप्रमुख ऍड.यश खराटे यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेतर्फे माहूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात राहुल नार्वेकर यांच्या पोस्टरला जोडे मारून निषेध केला आणि त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
यावेळी युवासेना उपजिल्हाप्रमुख जितू चोले तालुकाप्रमुख अक्षय वाघ, शहर प्रमुख संदीप गोरडे, महिला आघाडीच्या सुरेखा तळणकर, पवन चव्हाण, सचिन राठोड,प्रेम जयस्वाल, अक्षय आराध्ये,प्रवीण बरडे, गोकुळ गिनगुले,ऋषिकेश खंदारे सोनू तेल्हारे, मनोज जाधव, विलास पाटील, समाधान दवणे, सुनील चुंगडे अभिषेक जोगदंड, यांच्यासह युवा सेनेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *