मांडवीत दि.23 ते 30 जानेवारी पर्यंत स्वामी गजेन्द्र चैतन्य महाराज यांची रामकथा.

तालुका/प्रतिनिधी

समस्त माऊली मंडळ मांडवी आयोजित श्रीराम कथा सप्ताहाचे मांडवीत आयोजन करण्यात आले आहे. यासाठी शांतीधाम आश्रम माधापुरी जि. अकोला येथील परमपूज्य आचार्य बालयोगी स्वामी गजेंद्र चैतन्यजी महाराज यांचा संगीतमय श्रीराम कथा २३ ते ३० जानेवारीपर्यंत होणार आहे. या राम कथेची वेळ दुपारी १२ ते ४ वाजतापर्यंत राहील.

या सप्ताहात २५ जानेवारी रोजी गुरुदेव सेवा भजन मंडळ मांडवी यांचे भजन सायंकाळी ७ वाजता राहील तर २७ जानेवारीला ताटेवार व खाडे यांचे शास्त्रीय संगीत होणार आहे. काल्याचे किर्तन ३० जानेवारी रोजी परमपूज्य आचार्य बालयोगी स्वामी गजेंद्र चैतन्यजी महाराज यांच्याद्वारे होईल. कार्यक्रमादरम्यान रोज अन्नदान होणार आहे.

या कार्यक्रमाचा परिसरातील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा व इच्छुक अन्नदात्यांनी गजानन शेंडे यांच्याकडे तर यजमान पदासाठी दीपक जयस्वाल यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संयोजक माऊली मंडळ मांडवी यांच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *