आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त माहूर येथील श्री रेणुकामाता मल्टीस्टेट बँकेच्या वतीने पत्रकारांचा सन्मान.

श्रीक्षेत्र माहूर प्रतिनिधी/सुनिल राठोड माहूर

माहुर : येथे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त
माहूर येथील श्री रेणुकामाता मल्टीस्टेट को- ऑफ अर्बन क्रेडिट सोसायटी लि.अहमदनगर दिनांक ६जानेवारी २०२४रोजी
पत्रकार दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील पत्रकारांचा
सन्मान करण्यात आला असून आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र सुरू केले. बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म ६ जानेवारी १८१२ रोजी पोंभुरले येथे झाला. विशेष म्हणजे त्यांनी त्यांच्या जन्मदिनीच म्हणजे ६ जानेवारी १८३२ रोजी दर्पण हे महाराष्ट्रातील पहिले वृत्तपत्र सुरू केले.त्याकरिता त्यांनी दर्पण नावाचे पहिले वर्तमानपत्र सुरू केले. दर्पणचा पहिला अंक ६ जानेवारी १८३२ रोजी प्रकाशित झाला.दर्पण हे द्विभाषिक वर्तमानपत्र होते.एकाच वेळी इंगजी व मराठीत निघणाऱ्या या वर्तमानपत्राच्या पानातील दोन स्तंभात डावीकडचा स्तंभ इंग्रजी भाषेत तर उजवीकडच्या स्तंभात मराठी भाषांतर असे त्यात एकूण आठ पाने होते. जांभेकर यांनी वाचकांची मागणी वाढू लागल्याने दर्पण साप्ताहिक ४ मे १८३२ पासून सुरू केले. आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे निर्भीड पत्रकार होते या जयंतीनिमित्ताने माहूर येथील बॅक मॅनेजर निता झनक रेणुका बॅक मल्टीस्टेट को बॅंकेच्या वतिने पत्रकारांचा सन्मान करण्यात आला यावेळी जेस्ट पत्रकार वसंत कपाटे,राज ठाकुर पद्मा गि-हे,राजु दराडे, संजय घोगरे,गणेश चव्हाण, सुनिल राठोड टेलर,गणेश कचलवार,अनिल माडपेलिवार,समाधान कांबळे,आदेश बेहेरे, एस.आर.राठोड,शेख रफिक (गाईड),व पत्रकार मंडळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *