विविध बुथ वर जाऊन माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती साजरी.

माहूर/प्रतिनिधी-सुनिल राठोड

माहूर शहरासह तालुक्यात भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष कांतराम घोडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली,तालुका सरचिटणीस अर्चनाताई राजु दराडे यांनी बुथ क्र.५ टाकळी ता.माहूर येथे बुथवर जाऊन माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची ९९वी जयंती साजरी करण्यात आली.दि.२५डिंसेबर २०२३ रोजी महाराष्ट्रसह प्रत्येक बुथ वर भाजपाच्या पदाधिका-यांनी मा.पतंप्रधान वाजपेयी यांना आदरांजली वाहिली असून माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. देशभरात अटल बिहारी वाजपेयी यांना आदराजंली अर्पण केली जात आहे.माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस सुशासन दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.अटल बिहारी वाजपेयी यांनी तीन वेळा देशाचे पतंप्रधानपद भूषवले असून सन१९९६ मध्ये १३ दिवस, १९९८ ते १९९९ दरम्यान १३महिन्यासाठी आणि १९९९ ते २००४ दरम्यान पाच वर्ष ते प्रधानमंत्री म्हणून कार्यरत होते.या महान नेत्यांची जयंती साजरी करतांना यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष कांतराम घोडेकर,तालुका सरचिटणीस अर्चनाताई राजु दराडे,बुंथ प्रमुख तुकाराम फड,महेंद्र घालवट,दत्ता राऊत,नितिन तोडसाम आदीसह भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *