नांदेड-नागपूर बस अडवून पेटविली.

Nanded-Nagpur bus नांदेडहून नागपूरला जाण्यासाठी नांदेड आगाराची रातराणी बस प्रवासी घेऊन निघाली असताना शुक’वार, 27 ऑक्टोबरच्या रात्री 11.30 च्या सुमारास उमरखेड-हदगाव जवळील विदर्भ-मराठवाडा सीमेवर असलेल्या पैनगंगा नदीवरील पुलावर पेटवून दिली.मराठवाड्यातील गोजेगाव या ठिकाणावरून सात-आठ युवकांनी पाठीमागून पाठलाग करीत बस अडवून काचा फोडल्या आणि प्रवाशांना खाली उतरवून पेट्रोल टाकून बस जाळली.या घटनेत बसमध्ये असलेले 73 प्रवासी सुखरुप आहेत, मात्र बसचे सुमारे 32 लाखांचे नुकसान झाले आहे.

नांदेड आगाराचे बसचालक बापूराव नाईकवाडे आणि त्यांचे सहकारी वाहक शिवाजी वाघमारे हे बस क’मांक एमएच20 सीजी3189 ने प्रवासांना घेऊन नांदेडहून नागपूरला निघाले होते. मार्लेगाव पैनगंगा नदीच्या पुलावर सात ते आठ 24-25 वयोगटातील युवकांनी गोजेगाव या ठिकाणावरून काठ्या घेऊन बसचा पाठलाग केला.Nanded-Nagpur bus बस पुलावर मधोमध थांबवून बसच्या काचा काठ्या व दगडांनी फोडून नुकसान करत प्रवाशांना खाली उतरविले आणि टायरवर पेट्रोल टाकून बस पेटविली. या घटनेची माहिती मिळताच उमरखेड पोलिसांनी धाव घेत उमरखेड नगर परिषदेची अग्नीशमन यंत्रणा नेऊन आग आटोक्यात आणली.पुलावर गावर वारंगा हायवे प्रा. लि. कंपनीकडून पूल उभारणीचे काम सुरू आहे. त्यांच्या मदतीने खाक झालेली बस त्या ठिकाणावरून रस्याच्या बाजूला करण्यास मदत मिळाली. पहाटे 3 वाजता हा राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी सुरू झाला.बस नेमक्या कोणत्या कारनाने जाळण्यात आली याचा शोध उमरखेड पोलिस घेत आहेत. या घटनेची तक’ार उमरखेड पोलिस ठाण्यात बसचालक बापूराव नाईकवाडे यांनी नोंदविली आहे.यावरून ठाणेदार शंकर पांचाळ यांनी अज्ञात आरोपींविरुद्ध भादंवि कलम 143, 147, 148, 427, 341, 336 आणि सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रकरणी कलम 3 नुसार गुन्हा दाखल केला आहे.जाळण्यात आलेल्या या बसमधील प्रवाशांना पुढील प्रवासाकरिता उमरखेड आगारप्रमुख भदाडे यांनी बसची व्यवस्था करून दिली. नुकसानाची स्थिती व घटनेचा अहवाल हदगाव आगारप्रमुख धर्माधिकारी यांनी घेतला. अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाडवी, ठाणेदार शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक किशोर घोडेस्वार करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *