मुखेड (नांदेड): मुखेड- लातूर राज्य महामार्गावर सावरगाव पी.लादगा गावाजवळ पुणे ते नर्सी जाणारी खाजगी बस ( क्रमांक एम.एच.२० डी डीमुखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू असून गंभीर जखमींना नांदेडला हलवले आहे.अपघाताचे कारण अद्याप समजू शकले नाही.
एक खाजगी बस पुण्याहून मुखेड मार्गे नर्सीकडे निघाली होती. सकाळी ८ वाजेच्या सुमारास बस अचानक रस्त्याच्या खाली उलटली. सावरगाव पी. येथील ग्रामस्थांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस निरीक्षक रमेश वाघ, पोलिस उपनिरिक्षक गजानन अन्सापुरे, पोलिस उप नि.भारत जाधव यांनी भेट घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात रवाना केले.
वैद्यकिय अधिक्षक डाॅ किशोर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डाॅ. संतोष टाकसाळे, डाॅ. व्ही.टी.शेटवाड ,डाॅ. उमाकांत गायकवाड, मालती वाघमारे,बीजला फत्तेलष्कर ,वैषाली कुमठेकर, मनीषा पुंडे,तुलसी नाईक, नंदा सोनकांबळे,वर्षा पांचाळ,धम्मशिला मोडक,आश्वर्या जमादार, तुकाराम पाये, भिमराव गायकवाड, अभिनंदन पांचाळ, प्रशांत बनसोडे, अमर सुर्यवंशी यांनी उपचार केला. ७७०७ ) आज सकाळी 8 वाजेच्या सुमारास उलटली. या अपघातात १५ प्रवासी जखमी असून दोघे गंभीर जखमी आहेत.
जखमींची नावे अशी
राहुल वाघमारे ३५ रा.आलुवडगाव आणि विमलबाई मारोती नरवाडे ( ५०) ही दोघे गंभीर जखमी झाल्यामुळे नांदेड येथे अधिक उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. तर प्रणिता कदम १५ दुगाव, बालाजी कदम ५० दुगाव,लायक पठाण ३५ धामनगाव, लक्ष्मी पंदिलवाड २३ सगरोळी, विनोद जोंधळे २६ लालवंडी, सागरबाई जोंधळे ६० लालवंडी,इसुफ शेख ५४ चैनपुर, धुरपता गवते ५० कोंडलवाडी, साईनाथ मुंगडे ५० मंडलापुरकर, अंजनाबाई जाधव ४०, आदिती लोंडे १० दुगाव, सागरबाई कदम ४० अौराळ,अनिल इंगोले २५ आलुवडगाव , वनिता तोटरे ३५ धामनगाव, योगेश नरवाडे २१ सावरखेडा हे १५ प्रवासी जखमी झाले आहेत.