रेशन दुकानातून दारिद्रयरेषेखालील कुटुंबांना मिळणार दरवर्षी एक साडी.

ज्याच्या नव्या वस्त्रोद्योग धोरणाची अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. विणकरांना वार्षिक उत्सव भत्ता जाहीर केल्यानंतर आता दारिद्रय़रेषेखालील कुटुंबांना दरवर्षी एक साडी भेट म्हणून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.राज्यभरात सुमारे 25 लाख पिवळे रेशनकार्डधारक कुटुंब आहेत. या सर्व कुटुंबांना सणासुदीला रेशन दुकानातून वर्षातून एकदा ही साडी मोफत दिली जाणार आहे. राज्यात 2023 ते 2028 या पाच वर्षांसाठी एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरणाला मान्यता देण्यात आली आहे. या धोरणातील तरतुदीनुसार राज्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना वस्त्रोद्योग विभागामार्फत दरवर्षी यंत्रमागावरील एक साडी मोफत दिली जाणार आहे. रेशन दुकानांतून या साडय़ांचे वितरण केले जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *