बुलढाणा : धाड येथे १ कोटीचा गांजा जप्त, ट्रकही ताब्यात; तस्करीचे ‘मराठवाडा कनेक्शन’

बुलढाणा: स्थानिक गुन्हे शाखेने तालुक्यातील धाड नजीक केलेल्या कारवाईत तब्बल ४ क्विंटल ५९ किलो गांजा जप्त करण्यात आला. या कारवाईत मालवाहू वाहन (ट्रक) जप्त करण्यात आला असून चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.आज ९ नोव्हेंबरच्या पहाटे ही कारवाई करण्यात आली आहे.

राहुल गोटीराम साबळे (२७, रा. कुऱ्हा, तालुका मोताळा, जिल्हा बुलढाणा) याच्याविरुद्ध धाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगरवरून भोकरदन मार्गे धाड शहराकडे ट्रक येत असून त्यात अंमली पदार्थ असल्याची माहिती शाखेला प्राप्त झाली होती. त्यावरून धाड नजीकच्या हॉटेल स्वराज जवळील राज्य महामार्गावर सापळा रचण्यात आला. संशियत वाहनाची तपासणी केल्यानंतर त्यात गांजा असल्याचे दिसून आले. जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत तब्बल ९१ लाख ८८ हजार रुपये इतकी आहे. याशिवाय २२ लाख रुपये किमतीचा ट्रक आणि २ मोबाईल असा एकूण १ कोटी १४ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. एक आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

ही कारवाई पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या नेतृत्वात नंदकिशोर काळे, निलेश सोळंके, पोउपनि श्रीकांत जिंदमवार, गजानन माळी, शरद गिरी, पंकज मेहेर, एजाज खान, दिपक लेकुरवाळे, राजकुमार राजपूत, अनंता फरताळे, गणेश पाटील, पुरुषोत्तम आघाव, युवराज राठोड, गजानन दराडे, विक्रांत इंगळे, गजानन गोरले, शिवानंद मुंढे, राहुल बोर्डे, विलास भोसले यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *