सर्व पदव्युत्तर एम.ए विभागातुन प्रथम मेरीट आल्या बद्दल माधुरी कटकोजवार यांना सरदार पटेल महाविद्यालयाने केले सन्मानित

तालुका/प्रतिनिधी

सरदार पटेल महाविद्यालयातील स्व.शांताराम पोटदुखे सभागृहात आज दिनांक 18 ऑक्टोंबर ला महाविद्यालयाच्या सर्व पदवीत्तर एम. ए. विभागातुन प्रथम मेरिट आल्या बद्दल महाविद्यालयाच्या वतीने गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे सरदार पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.एम. काटकर सर्वोदय शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती सुधाताई पोटदुखे, उपाध्यक्ष माजी आमदार सुदर्शन निमकर , महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. स्वप्नील माधमशेट्टीवार, हिन्दी विभाग प्रमुख डॉ. सुनिता बनसोड मॅडम, सिनेट सदस्य व तरुण भारत चे जिल्हा प्रतिनिधी संजय रामगिरवार , प्रा.बेताल, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत 4 मोमेंटो, 4 प्रमाणपत्रे व रोख रक्कम अश्या स्वरूपाचा पुरस्कार माधुरी कटकोजवार यांना प्रदान करण्यात आला. यावेळी डॉ.पंकज मोहरीर, डॉ.राहुल सावलीकर, डॉ.संजय भुत्त्तमवार, प्रा.स्नेहल रायकुंडलिया आदींची उपस्थिती होती. प्राचार्य डॉ.पी.एम.काटकर यांनी आपल्या प्रास्ताविकातुन महाविद्यालयाचा विविध क्षेत्रातील वाढत्या आलेखाचा उल्लेख करीत पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. तत्पुर्वी गर्जा महाराष्ट्र माझा या गीताने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.कार्यक्रमाचे संचालन प्रा.महेंद्र बेताल यांनी तर आभार प्रदर्शन उपप्राचार्य डॉ स्वप्नील माधमशेट्टीवार यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *