प्रतिनिधी ज्ञानेश्वर गुरनुले
किनवट :तालुक्यातील दहेली येथे मराठा समाज आरक्षणाच्या संदर्भात व मनोज जरांगे पाटलाच्या समर्थनार्थ सकल मराठा समाजच्या वतीने सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना प्रवेश बंदी केली आहे. जालन्यातील मनोज जरंगे पाटील यांच्या आंदोलनानंतर मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापला आहे. आता तर राज्यभर ठिकठिकाणी आंदोलन निर्दशने करण्यात येत आहे आता तर नेत्यांना गावबंदी सुद्धा करण्यात येत आहे. मराठा समाज आरक्षणासाठी पुन्हा व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे जेव्हा पर्यंत मराठा समाजांना आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत सनदशीर मार्गाने हा लढा चालू राहील असे सकल मराठा बांधव दहेली तालुका किनवट व युवा ग्रामीण पत्रकार उमरी सर्कल प्रमुख राजदीप दिलीपराव भोसले यांनी व्यक्त केली आहे.