विश्व हिंदू परिषद तर्फे किनवट तालुक्यातील शिवणी येथे उद्या दिनांक १३ ऑक्टोबर शुक्रवार रोजी दुपारी १२ वाजता धर्म सभेचे आयोजन विश्व हिंदू परीषद बजरंग दलातर्फे शिवणी येथील हनुमान मंदिर प्रांगणात करण्यात आले आहे.
हि धर्मसभा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्ष पूर्ण होत असल्याने तसेच विश्व हिंदू परिषदेच्या स्थापनेला ६० वर्ष पूर्ण होत असल्याने छत्रपती शिवाजी महाराज शौर्य जागरण यात्रेचे आयोजन संपूर्ण महाराष्ट्रात केले. यात नांदेड जिल्ह्यात दिनांक ३० सप्टेंबर ते १४ ऑक्टोबर या कालावधीत केले किनवट जिल्ह्यातून आयोजन केलेल्या शौर्य यात्रेचा समारोपण शिवणी येथे होणार आहे या शौर्य जागरण यात्रेचा उद्देश वैभव संपन्न, उद्यमी, शौर्ययुक्त, समरस विजयी हिंदू समाज निर्माण व्हावा हा या यात्रेचा मुख्य उद्देश आहे यात हिंदू युवकांमध्ये आपल्या पूर्वजांप्रती गौरवाचा भाव जागृत व्हावा. अमर बलिदानी जीवन चरित्रातून प्रेरणा घेऊन हिंदू युवकांनी देशासाठी जगण्याची प्रेरणा घ्यावी. सर्व हिंदू समाज एक आहे. समरसतेचा भाव सवामध्येजागृत व्हावा. या करिता हिंदू युवकांनी संकल्पवद्ध व्हावे. तरुण पिढी दुर्व्यसनांपासून दूर राहून देशभक्तीयुक्त बलशाली हिंदू युवक आज देशाची आवश्यकता आहे. याचे महत्व हिंदू युवकांना समजावणे. स्वालंबनाची स्वाभिमानी, राष्ट्रभक्त हिंदू युवक जो राष्ट्राप्रति जीवन जगण्यासाठी कटीबद्ध असावा. व हिंदू धमार्चे स्वरक्षण मानव जातीच्या कल्याणासाठी असे अनेक विचार समाजात जागृत व्हावे या साठी उद्या दि. १३ ऑक्टोवर शुक्रवारी दुपारी १२ वाजता विश्व हिंदू परिषद तर्फे धर्म सभेचे आयोजन केले आहे. यात प्रमुख वक्ते म्हणून विहिंपचे क्षेत्र मंत्री गोविंदजी शेंडे मार्गदर्शन होणार आहे. प्रांत उपाध्यक्ष सुरेश महाराज सह विविध संत महंत व हिंदू धर्म विचारक यांचे मार्गदर्शन होणार आहे. करिता उद्या दि. १३ ऑक्टोवर शुक्रवार रोजी या धर्म सभेसाठी न किनवट जिल्यातील हिंदू बांधवानी सहभाग घ्यावा. असे आवाहन विश्व हिंदू परीषद जिल्हाध्यक्ष श्याम रायेवार, अनिरुद्ध केंद्रे, जिल्हा शौर्य यात्रा प्रमुख किरण विच्चेवार, जिल्हा सहमंत्री आशिष कऊटकर, संतोष रायेवार व शिवणी बजरंग दलाच्या कार्यकत्यांच्या वतीने अवाहन केले आहे.