जिल्हा परिषद शाळा सारखणी येथील कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक भास्करराव सर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा.

प्रतिनिधी ज्ञानेश्वर गुरनुले

किनवट: तालुक्यातील सारखणी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सारखणी येथील कर्तव्यदक्ष पदोन्नत मुख्याध्यापक आदरणीय श्री सुनील कोंडोपंत भास्करवार सर यांच्या वाढदिवस मोठ्या उत्साहाने शाळा व्यवस्थापन समिती ग्रामस्थ सारखणी शिक्षक वृंद व सर्व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.
सदर कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री संजय पवार, सामाजिक कार्यकर्ते श्री निलेश चव्हाण ,डॉक्टर चंदू हल्देश्वर ,श्री सौरभ जाधव ,श्री धनलाल राठोड व ग्रामपंचायत सदस्य श्री सचिन पवार उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवर श्री भास्करवार सर यांना पुष्पगुच्छ देऊन सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिले.
सूर्य उगवतांना आपल्या सोबत नवचैतन्य घेऊन येतो आणि सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतांना आमचे मन आनंदित होतो.
सर तुम्ही आम्हा सर्वांना सदैव आदर्श आहात. माणूस पैशाने श्रीमंत होत नाही माणूस माणसाने श्रीमंत होतात म्हणजे आपल्यावर प्रेम करणारी माणसं जेवढी जास्त आपण तेवढे श्रीमंत जगातले सर्वात श्रीमंत व्यक्ती आपणच आहात आमच्यातला अधिकारी कदाचित आम्ही एक दिवस विसरून जाऊ पण तुमच्यातला माणूस विसरणे शक्य नाही सर आम्हाला लाभलेला तुमचा सहवास कायमस्वरूपी स्मरणात राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *