घाटंजी तालुक्यातील दोन महिला व दोन लहान मुली बेपत्ता.

प्रतिनिधी/ज्ञानेश्वर गुरनुले

घाटंजी : तालुक्यातील मानोली येथील सौ माधुरी भगवान पेटकुले वय वर्ष 30 हे मानोली येथे राहत असून तिला दोन आपत्य आहे. तिचे व पतीचे पटत नसल्याने ती माहेरी तीन ते चार वर्षापासून राहते. व तिची मावशी सौ जयश्री अविनाश निकोडे वय तीस वर्षे ती सुद्धा मानोली येथे तिच्या पतीसोबत राहते. व तिला सुद्धा दोन आपत्य आहे. दिनांक 27 /9/ 2023 रोजी मानोली तालुका. घाटंजी जिल्हा.यवतमाळ येथून सौ माधुरी पेटकुले व भाची पूर्वी पेटकुले व तसेच जयश्री अविनाश निकोडे व तिची मुलगी गायत्री निकोडे राहणार मानोली असून पांढरकवडा येथे आखाडा वार्ड दर्ग्यावर दर्शनाकरिता आले असता. रात्र झाल्याने ते आखाडा वार्ड येथील लक्ष्मी ठाकरे यांच्या घरी थांबले होते. त्यांच्या दोघांचे मोबाईल बंद येत असल्याने त्यांचे भाऊ व त्यांचे मामा शोध घेण्याकरिता दोघे लक्ष्मीबाई ठाकरे यांच्या घरी आलेत व तेथे दोघेही दिसल्या ते म्हणाले की तुम्ही मानोली येथे चला असे म्हणाले. असता ठाकरे यांच्या घरी आलेली सौ आरती नखवते वय 30 वर्षे राहणार कळम हिने म्हणाले की आज रात्र झाली, दोन्ही लहान मुली आहे ,मी उद्या सकाळी मानोली येथे पोहोचून देते. असे म्हणल्याने आम्ही दोघेजण घरी परत आले. परंतु दोन दिवस झाले दोन्ही महिला व लहान मुली घरी न आल्यामुळे दिनांक 29 /9 /2023 रोजी सकाळी 10:30 वाजता च्या सुमारास लक्ष्मी ठाकरे यांच्या घरी जाऊन शोध घेतले असता दोन्ही महिला व लहान मुली न मिळाल्याने आरती शंकर भोयर यांना विचारपूस केले. असता आरती भोयर व त्यांची मावशी लक्ष्मी ठाकरे यांच्या घरी त्यांनी झोपेत असताना कोणालाही न सांगता दिनांक 28/ 9 /2023 रोजी रात्री दरम्यान उठून कुठंतरी निघून गेल्या आहे असे सांगितले. दोन्ही महिला व लहान मुली पांढरकवडा परिसरातील नातेवाईक कडे शोध घेतला तरी मिळून आले नाही. म्हणून त्यांचे भाऊ निखिल लेंडगुरे याने पोलीस स्टेशन पांढरकवडा येथे वरील घटना नोंदवली आहे. तरी वरील महिला व लहान मुली कोणास आढळून आल्यास खालील मोबाईल क्रमांकावर संपर्क करावे.
1)निखिल लेंडगुरे : 9380765932
2)लक्ष्मण चौधरी : 9689174130

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *