माहूर पंचायत समिती येथे गट शिक्षणाधिकारी मा. श्री रवींद्र जाधव साहेब यांना सेवानिवृत्ती.

प्रतिनिधी/ज्ञानेश्वर गुरनुले

किनवट : दहेली नगरीचे भूमिपुत्र तथा माहूर पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारी तथा अत्यंत शांत, सयंमी, हसतमुख मनमिळाऊ स्वभावाचे, शिस्तप्रिय, अभ्यासू, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत धडपड करणारे,जे जे आपणासी ठावे-ते ते इतरांशी सांगावे शहाणे करून सोडावे सकल जन समर्थ रामदास स्वामी यांच्या वचना प्रमाणे सर्व शिक्षकांना वेळोवेळी योग्य ते मार्गदर्शन करुन आपण कुठे ही कमी पडता कामा नये, ताठ मानेने आलेल्या संकटांना समर्थपणे तोंड देऊन ते पूर्ण करण्यासाठी सदैव कटीबद्द असणारे, शिस्तप्रिय, वेळेचे बंधन पाळणारे, एक आदर्श शिक्षक, केंद्र प्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी व गटशिक्षणाधिकारी ,एक उत्तम प्रशासक, उत्तम निवेदक, साहित्यिक, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, अध्यात्मिक व साहित्यिक श्रेत्रात सक्रिय सहभाग घेऊन ते पूर्ण करणारे, एक उत्तुंग सदाबहार, दिलदार, बहुआयामी, कार्यमग्न, सर्वांच्या सुख-दुःखात सहभागी होणारे, कार्यकुशल आपल्या कार्यकौशल्यामूळे शिक्षक ते गटशिक्षणाधिकारी पदावर पोहचणारे,सर्वांचे आवडते, एक आदर्श हरहुन्नरी अष्टपैलू व्यक्तीमत्व,आमचे ज्येष्ठ बंधू व मार्गदर्शक यांनी आपल्या सेवेची सुरुवात हदगाव तालुक्यातून सुरु केली, किनवट, हिमायतनगर, माहूर येथे सेवा केली. शिक्षक, केंद्रीय मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी व गटशिक्षणाधिकारी म्हणून शैक्षणिक श्रेत्रात भरीव योगदान व कामगीरी बजावली असे आमचे मार्गदर्शक मा.श्री आर.आर.जाधव सर.आपण 37 वर्षे 04 महिने प्रदीर्घ सेवा करुन काल दिनांक 30/09/2023 रोजी सेवानिवृत्त होत आहात.मा.सर आपणास भावी आयुष्यासाठी सुख,शांती, समाधान, आनंद, यश,कीर्ती, प्रतिष्ठा, ऐश्वर्य व समृद्धी लाभो. तसेच आपणास व आपल्या परिवारास भावी आयुष्यासात आपल्या आवडीच्या श्रेत्रात उल्लेखनीय कार्य करण्यास उत्तम आरोग्य व उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *