किनवट प्रतिनिधि/ज्ञानेश्वर गुरनुले
किनवट : युवा ग्रामीण संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांच्या अध्यक्षतेखाली व प्रदेश कार्यकारणी सदस्य कार्तिक बेहरे यांच्या उपस्थित युवा ग्रामीण पत्रकार संघाची कार्यकारणी बैठकीचे आयोजन करून तालुका कार्यकारणीची निवड गठीत करण्यात आली . यावेळी किनवटचे अजय पाटील कदम व सुर्यकांत मुंडे उपस्थित होते. युवा ग्रामीण पत्रकार संघ जाहिर करून गणेश कचकलवार पत्रकारांवर कुठल्याही परिस्थितीत वेळ प्रसंगी अन्याय होत असेल तर खपवून घेणार नाही. पत्रकारांच्या पाठिशी उभे राहू त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सदैव्य प्रयत्नशील राहिल असे यावेळी म्हणाले.
तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रात युवा ग्रामीण पत्रकार संघटनेची सध्या अतिशय वेगाने कार्यकारणी निवड जोर धरत आहे. कारण पत्रकारावर वारंवार होणारे जीवघेणे भ्याड हल्ले राजकीय दबाव त्यामुळे चौथा आधारस्तंभाचे निस्वार्थी व निर्भिड पत्रकार हे ठेकेदाराचे अफरातफर केलेले काम बातमी द्वारे जनतेसमोर मांडले जाते तेव्हा राजकीय दबाव येतो त्यामुळे संघटन अंत्यत महत्वाचे ठरते असे गणेश कचकलवार यांनी सांगितले.
किनवट तालुक्यात आज दि 23 सप्टेंबर 2023 रोजी शासकीय विश्रामगृहात बैठक घेऊन निवड कार्यकारणी जाहिर करून . यावेळी अध्यक्ष गणेश कचकलवार यांनी महिलांना सुद्धा संधी युवा ग्रामीण पत्रकार संघ यामध्ये दिली. जयश्री भरणे यांना विभागीय अध्यक्ष तर प्रिती मुनेश्वर विभागीय उपाध्यक्ष निवड करून नियुक्ती पत्र दिले आहे . , सुहास मुंडे जिल्हाध्यक्ष युवा आघाडी , गंगाधर कदम तालुकाध्यक्ष , रावसाहेब कदम ता. उपाध्यक्ष अमोल राठोड ता.उपाध्यक्ष , विलास भालेराव ता. सचिव , गजानन वानोळे तालुका सह सचिव, राजेश गायकवाड इस्लापूर सर्कल प्रमुख , दशरथ आंबेकर इस्लापूर सर्कल उपप्रमुख , भगवान बरगे जलधारा सर्कल प्रमुख, इम्रान घोडके शिवणी सर्कल प्रमुख , राजदीप भोसले उमरी सर्कल प्रमुख , ज्ञानेश्वर गुरनुले उमरी सर्कल उपप्रमुख बापुराव वावळे बोधडी सर्कल प्रमुख सत्कार करून संघटनेचे नियुक्ती पत्र देण्यात आले.अशी युवा ग्रामीण पत्रकार संघाची कार्यकारणी गठीत करण्यात आली .