पाथर्डी/प्रतिनिधी
फाटा या वेब सिनेमाचे चित्रीकरण पाथर्डी, धायतडकवाडी, मोहटे, कारेगाव व शिरूर कासार परिसरात पूर्ण झाले.
सदर फाटा या वेब सिनेमाची निर्मिती रमेश बारगजे सर यांच्या वेदिका फिल्म्स या निर्मिती संस्थेकडून करण्यात आली, सिनेमाचे दिग्दर्शन, पटकथा , संवाद हे रमेश बारगजे यांनी केले, कथा – अक्षय टेकाळे, कॅमेरा – मधुकर खेडकर, मुख्य भूमिकेत – अभिनेते संतोष बारगजे, निलेश बारगजे, राणा शिरसाट, संतोष सीताराम बारगजे ,विकास बारगजे, अजिनाथ बारगजे, अक्षय शिंदे ,देविदास बारगजे , विठ्ठल खेडकर, अमोल धायतडक, अभिनेत्री मानसी राऊत, खुशी टाकसाळ, यांनी भूमिका साकारली आहे.
सदर चित्रीकरण पाहण्यासाठी पंचक्रोशीतील गावकऱ्यांच्या प्रतिसाद उत्तम होता. आता प्रेक्षकांना हा वेब सिनेमा लवकर पाहण्याची उत्सुकता लागली आहे. सदर वेब सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येईल व त्यांच्या पसंतीस उतरेल अशी आशा संपूर्ण टीम ने व्यक्त केली.