प्रतिनिधि / जितेंद्र मेहता
चंद्रपूर : नांदेड येथील एक टोळी चंद्रपुरात येऊन दुचाकी चोरी करत असल्याची बाब नुकतीच समोर आली आहे. रामनगर पोलिसांनी दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीला विविध ठिकाणाहून अटक करून सात दुचाकी जप्त केल्या आहेत.
चंद्रपूर, गडचांदूर, कोरपना येथून दुचाकी चोरल्याचे तपासात समोर आले आहे. मोहसिन रफिक शेख, अरशद आसिफ शेख (दोघेही रा. सारखणी, जि. नांदेड), साहील अनिस शेख, अकबर गफार शेख दोघेही (रा. दहेली जिल्हा नांदेड), आकाश नामदेव गुरनुले (रा. करंजी जि. नांदेड) असे अटकेतील आरोपींचे नाव आहे. गजानन मंदिर वॉर्ड वडगाव, चंद्रपूर येथे राहणारा मूळचा गडचिरोली येथील हर्ष राजेश्वर ठुसे याची बुलेट घरासमोरुन चोरल्याची तक्रार २३ जुलैला रामनगर ठाण्यात केली. पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही तपासल्यानंतर तपासाची चक्रे फिरवून आरोपींना अटक केली.