तालुका / प्रतिनिधी
देव दर्शनसाठी जात असताना; पुणे-सोलापूर महामार्गावर अज्ञात वाहनाने कारला जोरदार धडक देऊन भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. तर या अपघातात ४ महिला भाविकांचा मृत्यू झाला असून, या अपघातात पालकमंत्र्यांचे निकटवर्ती नातेवाईक असल्याची माहिती समोर आलीय. तर सहा जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कारमधील अपघातग्रस्त महिला भाविक रांजणगाव (ता. पारनेर जिल्हा अहमदनगर) येथून तुळजापूर येथे दर्शनासाठी निघाल्या होत्या. दरम्यान, कार मोहोळ तालुक्यातील यावलीजवळ आली असता, बुधवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाने कारला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की कारमधील तीन महिलांचा जागीच तर एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच, स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
मृतांची ओळख पटली नसून, पोलिसांकडून अज्ञात वाहनाचा शोध घेतला जात आहे. अपघातामधील मृत हे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे निकतवर्तीय नातेवाईक असल्याची माहिती समोर आली आहे. पुढील तपास पोलीस करत आहते.