श्रीक्षेत्र : पर्यटनस्थळाच्या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी प्रादेशिक पर्यटन योजने अंतर्गत सन २०२३-२४ मध्ये जिल्हास्तरीय कामासाठी ११८ कोटी ८६ लाख निधीला मान्यता देण्यात आली तर एकूण ३५ कोटी ६५ लाख ८० हजार रुपयाचा निधी पर्यटन संचालनालय व संबंधित जिल्हाधिकारी यांना वितरित करण्यास शासनाद्वारे मान्यता देण्यात आली असून नांदेडजिल्ह्यातील तीर्थक्षेत्र माहूरसाठी ६ कोटी ३० लाखाच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे. यासाठी १ कोटी ८९ लाखाचा | निधी वितरित करण्यात आला आहे. तर नांदेड तालुक्यातील
मार्कडेश्वर मंदिर विकासासाठी २कोटीच्या निधीला मान्यता देण्यात आली असून ६० लाखाचा निधी वितरित करण्यात आला आहे. सदरील बैठक मुंबई येथे १० ऑगस्ट रोजी पार पडली. या बैठकीत नांदेडचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी माहूरसाठी हा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे जे कोणाला जमले नाही ते पालकमंत्री गिरीश महाजन यांनी करून दाखविल्याची चर्चा आहे.