प्रतिनिधी/विकास मेहता
माहूर : दि.२५ एप्रिल रोजी दु.२:३० वा. चे सुमारास मोबाईल हिसकावून पळालेला आरोपी मो. साबीर
मो. इब्राहीम सौदागर ( वय ४५ वर्षे) रा. शिवाजी चौक याला पोलिसांनी गुन्हा घडल्यापासून अवघ्या एका तासात ताब्यात घेऊन त्याचे ताब्यातून १४,०००रू किंमतीचा सॅमसंग कंपनीचा एक मोबाईल फोन जप्त केला आहे.
मोबाईल चोरट्यास ताब्यात घेण्याकामी पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक, डॉ. खंडेराव धरणे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, उपविभागीय पोलीस | अधिकारी विजय डोंगरे, पो. नि. डॉ. नितीन काशीकर यांचे मार्गदर्शन लाभले असून सपोनि श्रीधर जगताप, पो.ना.विजय आडे, पोहवा. बाबु जाधव, पांडुरंग गुरनुले, पोकॉ पवन राउत, ज्ञानेश्वर वेलदोडे, राठोड, इंगोले, राठोड यांनी ही कारवाई पार पाडली. या कारवाईचे सर्वत्र स्वागत होत आहे. परंतु मागील पंधरा दिवसात शहरांत झालेल्या दोन मोठ्या चोऱ्या व खुलेआम सुरु असलेल्या अवैध धंद्याचे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.